देवुथनी एकादशीच्या रात्री हे उपाय करणे राहील फायदेशीर

Life style

25 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

देवुथनी एकादशी ही खूप शुभ एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात.

देवुथनी एकादशी

देवुथनी एकादशी यावेळी 1 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी रात्री काही उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल, जाणून घ्या उपाय

करा हे उपाय

आर्थिक स्थिती चांगली राहील

जर तु्म्हाला घरामध्ये पैसे येईला हवे असतील, आर्थिक स्थिती चांगली हवी असेल तर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा.

कर्जातून सुटका

जो व्यक्ती कर्जाच्या समस्येपासून त्रस्त आहे आणि कर्जापासून सुटका हवी आहे अशा लोकांनी देवुथनी एकादशीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा

विवाह लवकरच होऊ शकतो

देवुथनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करण्यासोबतच केशर, हळद आणि चंदन लावल्याने लवकरच तुमचा विवाह होऊ शकतो.

नशिबाची साथ

देवुथनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशराच्या दुधाने अभिषेक करावा त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

काम होतील पूर्ण

देवुथनी एकादशीच्या दिवशी रात्री स्वयंपाकघरात एक दिवा लावा त्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

सकारात्मक ऊर्जा

देवुथनी एकादशीच्या दिवशी रात्री मुख्यप्रवेशद्वाराजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.