या गोष्टींची धनत्रयोदशीला खरेदी केल्याने होतील फायदे 

Life style

06 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीचा सण खूप चांगला मानला जातो. हा सण 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते 

धनत्रयोदशीचा सण

धनत्रयोदशीला या गोष्टींची खरेदी केल्यामुळे तुमचे नशीब जगू शकते. कोणत्या गोष्टींची खरेदी करावी जाणून घ्या

या गोष्टींची करा खरेदी

तांब्यांची भांडे

आपल्या घरात आनंद समृद्धी आणण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी पितळ आणि तांब्यांच्या भांड्याची खरेदी करावी

धणे खरेदी करा

जी व्यक्ती धनत्रयोदशीला धन्यांची खरेदी करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते

गोमती चक्र 

जर तुमचे होत असलेले काम वारंवार बिघडत असेल तर धनत्रयोदशीला गोमती चक्र घरी आणावे. हळूहळू तुमचे काम पूर्ण होईल.

मिठाची खरेदी करा 

धनत्रयोदशीला जर तुम्ही मीठ खरेदी केल्यास तर तुमचे कर्जाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल

झाडूची खरेदी 

झाडूला धनाची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशावेळी धनत्रयोदशीला झाडूची खरेदी केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात

मनात वाईट विचार 

धनत्रयोदशीला कोणत्याही गोष्टींची खरेदी करताना मनामध्ये वाईट विचार करू नये