धनत्रयोदशीला दारासमोर काढा या सुंदर रांगोळ्या

Lifestyle

06 November 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कमळाच्या पाकळ्यांची गुलाबी, पांढरी आणि पिवळ्या रंगांची रांगोळी काढा. भोवती पणत्या ठेवल्यास रांगोळी अधिक सुंदर दिसेल.

कमळाच्या फुलाची आकर्षक रांगोळी

Picture Credit: Pinterest

लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी

मुख्य दरवाजापासून घराच्या आतल्या दिशेने लक्ष्मीच्या पावलांची नक्षी काढा. ही रांगोळी शुभ मानली जाते.

Picture Credit: Pinterest

पणतीच्या आकाराची रांगोळी

Picture Credit: Pinterest

पणतीच्या आकारात केशरी, पिवळा, लाल आणि हिरवा रंग वापरून आकर्षक रांगोळी तयार करा.

कलशाची पारंपरिक रांगोळी

Picture Credit: Pinterest

धन आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाची नक्षी काढा. त्यात नारळ, आंब्याची पाने आणि फुलांची सजावट दाखवा.

 गोलाकार फुलांची रांगोळी

Picture Credit: Pinterest

गोलाकार रांगोळीत फुलांच्या पाकळ्यांसारखी नक्षी तयार करा. प्रत्येक पाकळीत वेगवेगळे रंग भरून आकर्षक लूक द्या.

स्वस्तिक आणि दिव्यांची रांगोळी

Picture Credit: Pinterest

स्वस्तिकाच्या भोवती फुलांची नक्षी आणि लहान पणत्या लावून पारंपरिक रांगोळी सजवा.

फुलांच्या पाकळ्यांची इको-फ्रेंडली रांगोळी

Picture Credit: Pinterest

झेंडू, गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या पानांचा वापर करून नैसर्गिक रांगोळी तयार करा. ही सजावट पर्यावरणपूरक आणि आकर्षक दिसते.