www.navarashtra.com

Published March 18,  2025

By Divesh Chavan

शंभूराजेंच्या पालनकर्त्या धाराऊ अक्का

Pic Credit - pinterest

14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला.

शंभूराजेंचा जन्म

शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई आजारी राहू लागल्या, त्यामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते.

सईबाईंची तब्येत बिघडली

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील धाराऊ गाडे नुकत्याच बाळंत झाल्या होत्या, म्हणून जिजाऊंनी त्यांना शंभूराजांच्या संगोपनासाठी बोलावले.

धाराऊंची निवड

धाराऊंनी मातृत्व अर्पण करत शंभूराजांना आपले दूध पाजले आणि त्यांचे पालनपोषण केले.

शंभूराजांचे पालनपोषण

1659 साली शंभूराजे अवघे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे निधन झाले.

सईबाईंचे निधन

धाराऊंच्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 26 होन देण्याचा आदेश दिला.

सन्मान

धाराऊंच्या रायाजी आणि अंतोजी या मुलांना राजगड आणि पन्हाळगड येथे नोकरी, तर त्यांच्या पतीला कापूरहोळची पाटीलकी बहाल करण्यात आली.

जबाबदाऱ्या

भगवान श्रीकृष्णाला आई यशोदा मिळाल्या तशाच शंभूराजांना धाराऊ अक्का लाभल्या, म्हणून त्यांना "स्वराज्याच्या धाकल्या धन्याची दूधआई" म्हटले जाते. 

दूधआईंचा मान

चैत्र नवरात्रीत या 2 राशींना मिळणार धनलाभ