Published Dev 02, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
सायबर चोर नागरिकांना संपर्क करून पोलिस, ED, CBI, प्राप्तिकर विभाग, लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करतात.
आधारकार्ड-सीमकार्डचा अशा अनेक गैरवापर झाल्याचे भासवून गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले जाते.
तुम्हाला येण्याची गरज नसून आहात त्या ठिकाणी किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत ‘डिजिटल अटक’ करावे लागेल असे सांगतात.
२४ तासांपर्यंत संबधित नागरिकाला कुणाच्याही संपर्कात न राहता व्हिडीओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते.
या कालावधीत व्हिडिओ कॉल मध्ये न्यायालयाचा परिसर दाखवून खटला चालवल्याचे भासवतात.
मदत करण्याच्या बहाण्याने, गुन्ह्यात वाचवण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.
.
फसवणूक करणारे स्वतःला CBI, पोलिस अधिकारी असल्याचे सांगून व्यक्तींना धमकवून फसवणूक करतात.
.
अशी फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइनवर, Cybercrime.gov.in या पोर्टलवर, स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी
.