Published Jan 5, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - pinterest
भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज कलाकारांचा वारसा लाभलेला आहे. यातील दोन नावं म्हणजे स्मिता पाटील आणि श्याम बेनेगल.
दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि स्मिता पाटील यांच्या 'मंथन' या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.
'मंथन' या सिनेमाच्या चित्रिकरणाची कथा देखील सिनेमाइतकीच रंजक आहे.
दिग्दर्शक श्याम बेनेगल सिनेमासाठी निर्माता मिळत नव्हता, त्यावेळेस त्यांना वर्गीज कुरियन यांनी क्राउडफंडिंगची कल्पना दिली.
त्यावेळी पाच लाख शेतकऱ्यांनी दोन रुपये स्वखुशीने सिनेमासाठी आर्थिक मदत केली होती.
1976 साली शेतकऱ्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे श्याम बेनेगल यांनी 'मंथन' सिनेमा बनवला.
हा सिनेमा त्यावेळी ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.
त्यावर्षी मंथन सिनेमाला सर्वोत्कृष्ठ पटकथा आणि सिनेमाचंं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं.