कंडोमचा वापर हा नेहमी शारीरिक संंबंधात सुरक्षेसाठी केला जातो. मात्र काही जणांना याचा त्रासही होऊ शकतो
Picture Credit: iStock
डॉ. नेहा दुबे, ए. डी. मेडिकल अँड कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट, मेड्डो मेराकी स्किन क्लिनिक, गुरुग्राम, लेटेक्स अॅलर्जीवर सांगितले आहे
कंडोममध्ये वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक रबरामुळे काही जणांना अॅलर्जी होऊ शकते. यामुळे शरीरावर खाज, रॅश वा श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो
शरीराच्या रोगप्रतिकारकशक्ती ही लेटेक्सला हानिकारक मानते आणि शरीरावर अॅलर्जी होते
कंडोमशिवाय अॅलर्जी मेडिकल उपकरणे, रबरची खेळणी, फुगे आणि मुलांच्या बाटल्यांमधूनही होते
अनेकदा कंडोमच्या केवळ स्पर्शानेच नाही तर अगदी त्यातील लेटेक्समुळे श्वास घेण्यासही त्रास होतो
लेटेक्स अॅलर्जी ही सामान्यतः पित्त, शरीरावर रॅश येणे, श्वास घ्यायला त्रास होणे वा छातीत दुखणे स्वरूपात दिसते
काही वेळा कंडोमच्या वापराने एनेफायलेक्सिस नावाची गंभीर रिअॅक्शनही होताना दिसते, ज्यामुळे ब्लड प्रेशर खाली येते
तुम्हाला कंडोम वापरल्यानंतर लगेच रॅश येत असेल तर त्वरील डॉक्टरांना भेट द्यायला हवी
ज्या व्यक्तींना लेटेक्स अॅलर्जी आहे त्यांनी सिंथेटिक कंडोमचा वापर करावा अथवा अन्य पर्याय निवडावा