लिंबाचे रस कोणी पिऊ नये

Lifestyle

05 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

लिंबाचा रस 

लिंबाचा रस म्हणजे लिंबू सरबत कोणाला प्यायला आवडत नाही आणि उन्हाळ्यात हे प्यायले जाते. पण लिंबाचा रस पिण्याचे तोटे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

लिंबामध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ॲसिडिटी किंवा छातीत जळजळीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण वाढून पोटात मळमळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

ॲसिडिटी व छातीत जळजळ 

Picture Credit: Pinterest

 ज्या लोकांना पेप्टिक अल्सरचा त्रास आहे, त्यांनी लिंबूपाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्यास त्यांच्या पोटाच्या अस्तराची जळजळ होऊन वेदना वाढू शकतात.

पोटाचे अल्सर 

Picture Credit: Pinterest

दातांची समस्या 

लिंबाच्या अति ॲसिडिक गुणधर्मामुळे दातांचे इनॅमल  खराब होऊ शकते. ज्या लोकांच्या दातांमध्ये आधीच सेंसिटिव्हिटीची समस्या आहे किंवा दातांवर काही उपचार सुरू आहेत, त्यांनी लिंबाचा रस पिणे टाळावे.

Picture Credit: Pinterest

जर तोंडात फोड आले असतील किंवा जिभेवर अल्सर झाला असेल, तर लिंबाच्या रसामुळे तीव्र जळजळ होऊ शकते. 

तोंडात अल्सर 

Picture Credit: Pinterest

काही आयुर्वेद तज्ज्ञांनुसार आणि आरोग्याविषयीच्या अहवालानुसार, हाडांचे आजार किंवा संधिवात  असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन करणे टाळावे. 

हाडांचे आजार

Picture Credit: Pinterest

कसा प्यावा

Picture Credit: Pinterest

लिंबाचा रस पिताना नेहमी तो पाण्यात मिसळून प्यावा आणि दातांचे रक्षण करण्यासाठी 'स्ट्रॉ' चा वापर करावा.