बदाम खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचा आहारामध्ये समावेश करावा.
बदाम खाणे काही लोकांसाठी फायदेशीर आहे. पण काही लोकांनी ते खाल्ल्याने त्याचे तोटे होऊ शकतात. बदाम खाण्याचे तोटे जाणून घ्या
पौष्टिक पदार्थासोबत बदामाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. नाहीतर त्याचे नुकसान होऊ शकतो.
बदामामध्ये पौष्टिक फॅट असते. मात्र त्यामध्ये कॅलरी भरपूर प्रमाणात असतात.
23 बदामामध्ये 160 कॅलरी असतात. भरपूर प्रमाणात बदाम खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता आहे
बदामामध्ये फायबर जास्त असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते.
काही लोकांना नट्समुळे ॲलर्जी आहे. यामुळे खाज, सूज, श्वास घेण्यास समस्या येऊ शकतात.
बदामांमध्ये ऑक्सलेट असते. जास्त प्रमाणात ऑक्सलेटचे सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.