बेकिंग सोड्याचे अतिसेवन ठरू शकते घातक

Lifestyle

05 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

पोटाच्या समस्या

जास्त सोड्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो, पोट फुगणे, सूज येणे, मळमळणे आणि सतत ढेकर येणे असा त्रास होतो.

Picture Credit: Pinterest

बेकिंग सोड्यात भरपूर सोडियम असते. यामुळे रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढण्याचा धोका बळावतो.

रक्तदाब वाढण्याचा धोका

Picture Credit: Pinterest

शरीरात जास्त सोडियम गेल्यामुळे द्रव साचून राहू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर अतिरिक्त ताण येतो.

हृदयाचे आरोग्य 

Picture Credit: Pinterest

किडनीवर ताण 

जास्त सोडियम फिल्टर करताना किडनीला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे आधीच आजारी असलेल्या किडनीची स्थिती आणखी बिघडू शकते.

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडणे 

Picture Credit: Pinterest

सोड्याच्या अतिसेवनामुळे शरीरातील पोटॅशियम आणि इतर खनिजांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येणे आणि तीव्र थकवा जाणवतो.

मेटाबॉलिक अल्कॅलोसिस  

Picture Credit: Pinterest

रक्तातील आम्ल-क्षार (pH) चे प्रमाण बिघडल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि स्नायूंत आकडी येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

औषधांच्या शोषणात अडथळा 

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही इतर कोणतीही औषधे घेत असाल, तर बेकिंग सोडा पोटातील ॲसिड कमी करतो, ज्यामुळे औषधे शरीरात नीट शोषली जात नाहीत किंवा त्यांचे परिणाम बदलू शकतात