शिक्षक दिनी टीचरला गिफ्ट म्हणून द्या या खास गोष्टी

Lifestyle

04 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

शिक्षक दिन  2026

शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ते शिक्षणासाठी समर्पित होते आणि एक शिक्षकही होते.

Picture Credit: Pinterest

शिक्षकांसाठी पेन हे नेहमीच उपयोगी गिफ्ट ठरते. सुंदर बॉक्समधील दर्जेदार पेन सेटसोबत छोटासा शुभेच्छा संदेश दिल्यास भेट आणखी खास होईल.

पेन सेट

Picture Credit: Pinterest

शिक्षकांचे नाव, फोटो किंवा एखादा सुंदर संदेश असलेला मग तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. ही भेट आठवण म्हणूनही जपून ठेवता येईल.

पर्सनलाइज्ड मग

Picture Credit: Pinterest

स्टेशनरी ऑर्गेनाइजर

तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी एक स्टेशनरी ऑर्गनायझर खरेदी करू शकता, ज्यात ते त्यांचे पेन आणि लहान डायऱ्या ठेवू शकतील. ही एक उपयुक्त भेट ठरेल. कोरीव लाकडी ऑर्गनायझर्स सुंदर दिसतात आणि तुमची आठवण म्हणून ते त्यांच्या डेस्कवर ठेवता येतात.

Picture Credit: Pinterest

डायरी आणि पेन

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमच्या शिक्षकांना एक सुंदर डायरी आणि एक छान पेन भेट देऊ शकता. तुम्ही डायरीचे पहिले पान सजवू शकता आणि तिचे मुखपृष्ठ खास बनवू शकता. तुम्ही त्यावर "सर्वोत्तम शिक्षिका!" अशा ओळी लिहू शकता.

छोट इनडोअर प्लांट

Picture Credit: Pinterest

निसर्गाची आवड असलेल्या शिक्षकांसाठी छोटं इनडोअर प्लांट सुंदर गिफ्ट ठरू शकते. डेस्कवर ठेवता येणारे रोप त्यांच्या टेबलची शोभाही वाढवेल.

ग्रीटिंग कार्ड

Picture Credit: Pinterest

महागड्या भेटवस्तूऐवजी स्वतःच्या हाताने लिहिलेले धन्यवादपत्र किंवा शुभेच्छापत्र शिक्षकांना नक्कीच भावेल. त्यात शिक्षकांनी तुमच्या आयुष्यात केलेल्या योगदानाबद्दल काही मनापासून शब्द लिहा.