भोपळ्याच्या बियांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
या बियांमध्ये फायबर भरपूर असते. अतिप्रमाणात फायबर पोटात गेल्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटात पेटके येणे यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होतात.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात फायबरयुक्त बिया खाल्ल्यामुळे काहींना पोटात मळमळणे आणि अतिसाराचा त्रासही होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
या बियांमध्ये ऑक्झॅलेट्सचे प्रमाण असते. त्यामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये जास्त सेवनामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
काही लोकांना भोपळ्याच्या बियांमुळे ॲलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेस उठणे, खाज सुटणे किंवा मळमळणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Picture Credit: Pinterest
या बिया नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. ज्या लोकांचा रक्तदाब आधीच कमी आहे, त्यांनी याचे सेवन टाळावे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
भोपळ्याच्या बियांमध्ये टॅनिन आणि ऑक्सालेट्ससारखे घटक असतात, जे रक्त पातळ करणाऱ्या किंवा लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधांवर परिणाम करू शकतात