तुम्हाला पण चिप्स खायला खूप आवडते, जास्त प्रमाणात खाता का? जास्त चिप्स खाण्याचे काय आहेत नुकसान जाणून घ्या
चिप्समध्ये कॅलरी आणि फैटची मात्रा जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते
एका चिप्सच्या पॅकेटमध्ये 150 ते 200 कॅलरी असतात. जे वारांची खाल्ल्याने चरबी वाढू शकते.
चिप्समधील ट्रान्स फैट आणि सैचुरेटेड फैट असल्याने कॉलेस्ट्रॉल वाढते.
यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
चिप्समध्ये सोडियम म्हणजे मीठ भरपूर प्रमाणात असते. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते
जास्त पॅक केलेले चिप्स खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो.
सतत जंक फूड आणि चिप्स खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.