बासमती तांदूळ धुवून 20–30 मिनिटे भिजत ठेवा. नंतर अख्ख्या मसाल्यांसह पाण्यात 70% शिजवून बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
कच्चा फणस कुकरमध्ये थोडे मीठ घालून 2–3 शिट्ट्या देऊन शिजवा. पाणी गाळून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल/तूप गरम करून कांदे सोनेरी तळा. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतवा, मग टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
आंच कमी करून दही घाला आणि ढवळा. त्यात बिर्याणी मसाला, मीठ घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
शिजवलेला फणस मसाल्यात घालून 5–7 मिनिटे छान परतून घ्या, जेणेकरून मसाले मुरतील.
Picture Credit: Pinterest
जाड भांड्यात फणसाचा मसाला, भात, कोथिंबीर-पुदिना, केशर दूध घाला. असे 2 लेयर करा. झाकण लावून मंद आचेवर 10–12 मिनिटे दम द्या.
Picture Credit: Pinterest
दम सुटल्यावर हलक्या हाताने बिर्याणी मिक्स करा. गरमागरम फणस बिर्याणी रायता, कोशिंबीर किंवा सॅलडसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest