गर्मीत एसीचा अतिवापर, खरंच योग्य?

Lifestyle

24 May, 2025

Author: Divesh Chavan

एसी थेट हाडं गळवत नाही, पण दीर्घकाळ खूप थंड वातावरणात राहिल्यास सांधे आणि स्नायूंमध्ये जकडण येऊ शकते.

एसी हाडं गळवतो का?

Picture Credit: iStock

लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी एसीचा जास्त वापर घातक ठरू शकतो, विशेषतः ज्यांना सांधेदुखी किंवा आर्थरायटिसचा त्रास आहे.

धोका

एसीमध्ये वेळ घालवणारे लोक उन्हात कमी जातात, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन D कमी होते, जे हाडांसाठी अत्यावश्यक आहे.

व्हिटॅमिन D ची कमतरता

जास्त थंडीत राहिल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम हाडांवरही होतो.

इम्युन सिस्टमवर परिणाम

एसीची हवा कोरडी असते, त्यामुळे त्वचा आणि सांध्यात ड्रायनेस (कोरडेपणा) निर्माण होतो.

त्वचा आणि सांध्यात कोरडेपणा

एसीचे तापमान २४ ते २६ डिग्री सेल्सियस ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

उत्तम तापमान किती?

एसीची थंडी थेट शरीरावर पडू देऊ नका; यामुळे स्नायू कडक होऊ शकतात.

थेट थंडी शरीरावर लागू देऊ नका