Published Oct 26, 2024
By Prajakta
Pic Credit - istock
प्सनातन धर्मामध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे. यावेळी पूजा-पाठ करण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीला धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया.
पंचांगानुसार यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. यादरम्यान देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते.
असे अनेक उपाय आहेत जे दिवाळीच्या दिवशी करणे शुभ मानले जाते. हे उपाय केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभ होतो.
दिवाळीला मातीचे भांडे लाल रंगाने रंगवा. त्यावर एक नारळ ठेवून तो पाण्यात तरंगवावा, असे केल्याने साधकाला आर्थिक लाभ होईल.
दिवाळीला लोखंडाच्या भांड्यात पाणी, तूप, साखर आणि दूध मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. याशिवाय तुपाचा दिवा लावून 11 वेळा परिक्रमा करा.
दिवाळीच्या दिवशी मंदिरात झाडू किंवा अगरबत्ती दान केली पाहिजे. याचे दान केल्याने गरिबी दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
दिवाळीला पूजा करताना उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावायला पाहिजे. त्याचे दहन केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी दिवाळीत हे उपाय करावेत, असे केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते..