www.navarashtra.com

Published Oct 25, 2024

By Narayan Parab 

पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे वारसदार, होणार का आमदार?

Pic Credit -  Social Media,

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आहेत. याठिकाणी तिरंगी निवडणुक होणार आहे. 

अमित ठाकरे

रोहित पाटील हे दिवंगत माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आहेत. रोहित तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

रोहित पाटील 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जळगावमधील  मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

रोहिणी खडसे 

श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. त्या नांदेडमधील  भोकर येथून भाजपच्या उमेदवार आहेत.  

श्रीजया चव्हाण

भाग्यश्री अत्राम या मंत्री बाबाराव आत्राम यांच्या कन्या आहेत. गडचिरोलीतील अहेरीतून भाग्यश्री या त्यांच्या वडिलांविरुध्दच उभ्या ठाकल्या आहेत.  

भाग्यश्री आत्राम 

दिवंगत मनसे नेते रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे हे मनसेकडून  खडकवासला चे उमेदवार आहेत.

मयुरेश वांजळे

नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत.

सना मलिक

खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे पैठण या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. 

विलास भुमरे

'अशी' झाली शिवसेनेची स्थापना