संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी दिवाळीला तुळशीचे करा हे उपाय

Life style

09 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. यावेळी गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते 

दिवाळी 2025

हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानले जाते. दिवाळीमध्ये तुळशीच्या मंजिरीचे उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. 

तुळशीच्या मंजिरीचे उपाय

देवी लक्ष्मीला अर्पण करा

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुळशीची मंजिरी अर्पण करायला हवी. यामुळे घरामध्ये आणि जीवनात सुख समृद्धी येते. संकट दूर होऊन इच्छा पूर्ण होतात.

विष्णूंना अर्पण करणे

दिवाळीच्या दिवशी विष्णूंना तुळशीची मंजिरी अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहते.

तिजोरीमध्ये ठेवा

दिवाळीच्या दिवशी तुळशीची मंजिरी घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी लाल कपड्यात बांधून ठेवावी. असे केल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होईल.

गंगाजलात मिसळून शिंपडा

तुळशीची मंजिरी गंगाजलात मिसळून पूर्ण घरात शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल

कधी आहे दिवाळी

दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यावेळी कार्तिक अमावस्या 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी आहे त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल