दिवाळी हा सण साधारणपणे पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होत असताना येतो. या बदलत्या ऋतूत शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. फराळामध्ये असणारे तूपकट, तेलकट आणि ऊर्जावर्धक पदार्थ शरीराला नैसर्गिक उष्णता आणि ताकद देतात.
Picture Credit: Pinterest
फराळात वापरले जाणारे घटक जसे की सुकामेवा (काजू, बदाम), डिंक, तूप, बेसन, कडधान्ये आणि तीळ शरीराला आवश्यक स्निग्धता, प्रथिने आणि खनिजे पुरवतात, ज्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला प्रतिकारशक्ती टिकून राहते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदानुसार, या थंड हवामानात शरीराची अग्नी (पचनशक्ती) चांगली असते, त्यामुळे जड किंवा थोडे तेलकट-गोड पदार्थ शरीर सहज पचवू शकते.
Picture Credit: Pinterest
वर्षभर कडक डाएट किंवा अपुरा आहार घेण्याऐवजी, शरीराला गरजेनुसार योग्य स्निग्धता आणि कॅलरीज मिळून आहाराचा समतोल राहावा हा यामागील पारंपरिक दृष्टिकोन आहे.
Picture Credit: Pinterest
बेसन, रवा, तूप आणि सुकामेवा वापरून बनवलेल्या लाडूंमधून ऊर्जा मिळते. बदाम आणि काजूमध्ये प्रथिने, चांगले फॅट्स आणि खनिजे असतात.
Picture Credit: Pinterest
पोह्यांपासून बनवलेल्या चिवड्यात शेंगदाणे, कढीपत्ता आणि इतर घटक वापरले जातात. शेंगदाण्यांमधून प्रथिने आणि फॅट्स मिळतात.
Picture Credit: Pinterest
फराळ पौष्टिक घटकांनी बनलेला असला तरी तो प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. तळलेले आणि गोड पदार्थ मर्यादित खा. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचाल यांचीही काळजी घ्या.