उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
या मोसमात बाईकची विशेष काळजी घ्यावी लागते.
अनेकदा या मोसमात बाईकचा टायर फुटण्याच्या घटना समोर येत असतात. मात्र, असे का होते?
उन्हाळ्यात टायरमधील हवा गरम होऊन तिचा दाब वाढतो आणि टायर फुटण्याचा धोका वाढू शकतो.
जर टायरमध्ये कंपनीने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त हवा भरली असेल तर उष्णतेमुळे दाब वाढून टायर फुटू शकतो.
जास्त वापरलेला किंवा खूप घासलेला टायर उन्हाळ्यात जास्त लवकर खराब होतो आणि फुटण्याची शक्यता वाढते.
उष्ण हवामानात जास्त वेगाने बाईक चालवल्यास टायरवर जास्त घर्षण निर्माण होते ज्यामुळे टायरचे होऊन नुकसान होऊ शकते.