महिलांना प्रत्येक महिन्यात मासिकपाळीने रक्तस्त्राव होत असतो.
Img Source: Pintrest
दर महिन्याला हार्मोनल बदल झाल्याने मूड स्विंग्स किंवा सतत तणावात असणं असे मानसिक त्रास दिसून येतात.
मात्र तुम्हाला माहितेय का पुरुषांमध्ये देखील असेच काही हार्मोनल बदल दिसून येतात.
पुरुषांना दर महिन्याला रक्तस्त्राव होत नाही मात्र हार्मोनल सायकल नक्कीच असते.
या हार्मोनल सायकलच्या बदलामुळे पुरुष देखील चिडचिड करणं आणि तणावात असतात.
या सगळ्याला इरिटेबल मेल सिंड्रोम असं म्हणतात.
याचाच अर्थ पुरूषही हार्मोनल सायकलमधून जातात फक्त त्यांना रक्तस्त्राव होत नाही.
याचं मुख्य कारण मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन असतं.
यामुळे मानसिकतेत बदल होतात आणि थकवा आणि डिप्रेशनला पुरुष सामोरे जात असतात.