शुक्रवारी मांसाहार आणि मद्यपान करणे अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील.
या दिवशी सात्विक भोजन केल्याने मन शांत राहील आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.
शुक्रवारी वादविवाद, भांडण आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कारण यामुळे शुक्र ग्रह प्रभावित होऊ शकतो.
असे मानले जाते की, यावेळी आर्थिक व्यवहार केल्याने नुकसान होऊ शकते.
शुक्रवारी आर्थिक व्यवहार, उधार घेणे किंवा देणे निषिद्ध मानले जाते.
मान्यतेनुसार यामुळे आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो.
या दिवशी जमीन, मालमत्ता किंवा कोणतेही मोठे डिल करणे टाळायला हवे.
त्यासोबतच स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूची खरेदी आणि एखाद्या गोष्टी घेणे अशुभ मानले जाते.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुपाचा दिवा लावून पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.