शिवलिंगावर चुकूनही या वस्तू अर्पण करू नका

Life style

28 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

श्रावणात शिवलिंगाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर पूजा करताना काही वस्तू अर्पण केल्या जातात.

शिवलिंगाची पूजा 

शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण करु नये अन्यथा भगवान शिव नाराज होतात, अशी मान्यता आहे.

या गोष्टी अर्पण करु नये

तुळशीची पान विष्णूंना खूप आवडतात. मात्र शिवलिंगावर ही अर्पण करु नये. हे महादेवाचा अनादर मानले जाते.

तुळशीची पान

हळद ही देवी लक्ष्मी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. शिवलिंगावर ती अर्पण करणे योग्य नाही कारण शिव एक तपस्वी आहेत आणि सौंदर्यप्रसाधनांपासून दूर राहतात.

हळद अर्पण करु नये

कुंकू अर्पण करु नये

कुंकू मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे. जे देवी पार्वतीशी संबंधित आहे. शिवलिंगावर ते अर्पण करणे अयोग्य मानले जाते

तांदूळ अर्पण करु नये

शिवलिंगावक तांदूळ अर्पण करु नये. तुटलेले तांदूळ अशुद्ध मानले जातात आणि ते अर्पण केल्याने पूजा अपूर्ण होते.

शंखाचे पाणी

शंख भगवान विष्णूचे प्रतीक आहे. शिवलिंगाला शंखापासून पाणी अर्पण करण्यास मनाई आहे 

शिवाचे आवडते साहित्य

शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दही, मध, गंगाजल आणि धतुरा या गोष्टी अर्पण करावे. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि दोष दूर होतात.

चुकीचे अर्पण केल्यास प्रभाव

शिवलिंगावर चुकीचे साहित्य अर्पण केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि महादेव नाराज होऊ शकतात.