पावसाळ्यात फिटनेससाठी करा 'हे' व्यायाम

Lifestyle

02 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

होम कार्डिओ

बाहेर धावणे शक्य नसल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी घरातल्या घरात एकाच जागेवर जॉगिंग करणे किंवा हाय-नीज करावे.

Picture Credit: Pinterest

हा संपूर्ण शरीराचा फॅट बर्न करणारा सर्वोत्तम व्यायाम आहे; यामुळे कमी वेळात जास्त कॅलरीज जळतात आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.

दोरीच्या उड्या 

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी दररोज १० ते १२ सूर्यनमस्कार घालणे हा एक परिपूर्ण शास्त्रीय व्यायाम आहे.

सूर्यनमस्कार 

Picture Credit: Pinterest

स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी कोणत्याही उपकरणांशिवाय घरातच पुश-अप्स, स्क्वेंट्स आणि लंजेस यांसारखे सोपे व्यायाम करावेत.

स्ट्रेंथ ट्रेनिंग 

Picture Credit: Pinterest

कोअर स्ट्रेंथ आणि प्लॅक 

पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि पाठीचा कणा सुस्थितीत ठेवण्यासाठी दररोज १ ते २ मिनिटे 'प्लॅक पोझिएशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो.

Picture Credit: Pinterest

पायऱ्यांचा वापर 

Picture Credit: Pinterest

तुमच्या घरात किंवा इमारतीमध्ये पायऱ्या असतील, तर ५ ते १० मिनिटे पायऱ्या चढ-उतार करणे हा पायांच्या स्नायूंसाठी आणि हृदयासाठी उत्तम व्यायाम आहे.

योगासने आणि प्राणायाम

Picture Credit: Pinterest

पावसाळी हवेतील ओलसरपणामुळे होणारे श्वसनाचे आजार रोखण्यासाठी कपालभाती, अनुलोम-विलोम प्राणायाम आणि भुजंगासनासारखी योगासने अत्यंत फायदेशीर ठरतात.

झुंबा किंवा डान्स  

Picture Credit: Pinterest

व्यायामाचा कंटाळा येत असल्यास घरात हलके संगीत लावून १५ ते २० मिनिटे झुंबा किंवा डान्स करावा; यामुळे शारीरिक व्यायामासोबतच मानसिक ताण आणि सुस्तीही दूर होते.