पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणपती नदीकाठी ध्यान आणि तपश्चर्या करत बसले होते. त्यावेळी तुळशी देवी तेथून जात होती.
Picture Credit: Pinterest
गणपतीचे रूप आणि व्यक्तिमत्त्व पाहून तुळशी देवी प्रभावित झाली. तिने गणपतीशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली.
Picture Credit: Pinterest
गणपतीने तुळशी देवीच्या विवाहाच्या प्रस्तावाला नकार दिला. आपण तपश्चर्या आणि ब्रह्मचर्याचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Picture Credit: Pinterest
गणपतीने नकार दिल्याने तुळशी देवीला दुःख झाले आणि तिने रागाच्या भरात गणपतीला शाप दिल्याचे कथेत सांगितले जाते.
Picture Credit: Pinterest
पुढे तुळशी देवीचा विवाह एका असुराशी होईल, असा प्रत्युत्तर शाप गणेशानेही तुळशीला दिला.
Picture Credit: Pinterest
नंतर दोघांनाही पश्चात्ताप झाला. त्यांनी एकमेकांना दिलेले शाप मागे घेतले. पण तेव्हापासून गणपतीच्या पूजेत तुळशीपत्र न वाहण्याची परंपरा सुरू झाली.
Picture Credit: Pinterest
यामुळेच तुळस नव्हे तर गणेशपूजेत दुर्वा, शमीची पाने आणि विविध प्रकारची पत्री अर्पण करण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest