Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
शरीर आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे.
आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर याचा परिणाम शरीरावर देखील होतो.
बऱ्याच जणांना व्यक्त होता येत नाही किंवा काही माणसं व्यक्त होणं टाळतात.
अनेकांना आतल्या भावना दाबून टाकण्याची सवय असते.. मात्र असं केल्याने शरीरावर याचा वाईट परिणाम होतो.
रडावसं वाटत असूनही तुम्ही रडत नसाल तर यामुळे घसा दुखायला लागतो.
बोलायचं असूनही बोलणं टाळणं , मनात कुढत राहणं यामुळे देखील घसा दुखतो.
जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढत गेला तर खांदे आणि मानदुखी सुरु होते.
तुम्हाला सतत चिंता किंवा मानसिक नैराश्य असल्यास अपचानाचा त्रास जास्त जाणवतो.
जर तुम्ही सतत अतिविचार करत असाल किंवा तणावाखाली असाल तर डोकेदुखी होण्याची शक्यता जास्त असते.
सततच्या नकारात्मक विचारांमुळे चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो.
जर तुम्ही आनंदी असाल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीत राहतं.