Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
मांसाहाराचे सेवन करणाऱ्या अनेकांना मासे खायला खूप आवडतात.
सुरमई, पापलेट आणि कोळंबी हे मासे फक्त चवीला चांगले नाही तर आरोग्यदायी देखील आहेत.
या माशांमध्ये ओमेगा 3 फॅट्सचं प्रमाण जास्त असतं.
आठवड्यातून एकदातरी माशांचं सेवन केल्याने मेंदूचं आरोग्य सुदृढ राहतं.
व्हिटामीन डी ची मात्रा मुबलक मिळाल्याने निद्रानाशाची समस्या कमी होते.
त्यामुळे तज्त्रांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून एकदातरी मासे खाणं आरोग्यदायी ठरतं.
नैराश्यावर मात करण्यासाठी देखील माश्यांचं सेवन फायदेशीर आहे.