हवामान खातं पावसाचं मोजमाप नेमकं कसं करतं?

Science Technology

 01 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पाऊस मोजतात तरी कसा?

टीव्ही किंवा मोबाईलवर तुम्ही 20 मिमी, 50 मिमी किंवा 100 मिमी पावसाची माहिती पाहता. पण हा आकडा कोणत्या पद्धतीने मोजला जातो, हे अनेकांना माहिती नसतं.

Picture Credit:  pinterest

Rain Gauge म्हणजे काय?

Rain Gauge हे पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जाणारं विशेष उपकरण आहे. पडणारं पाणी या उपकरणात जमा होतं आणि त्यावरून किती पाऊस झाला हे मोजलं जातं.

Picture Credit:  pinterest

'मिमी' म्हणजे नेमकं काय?

1 मिमी पाऊस म्हणजे एका चौरस मीटर जागेवर सुमारे 1 लिटर पाणी साचण्याइतकं पावसाचं प्रमाण. त्यामुळे मिमी जितके जास्त, तितका पाऊस अधिक.

Picture Credit:  pinterest

Automatic Rain Gauge कसा काम करतो?

आधुनिक Rain Gauge मध्ये सेन्सर्स असतात. पाऊस सुरू होताच हे उपकरण आपोआप मोजमाप करून माहिती थेट हवामान केंद्राकडे पाठवतं.

Picture Credit:  pinterest

Weather Radar ची कमाल

Weather Radar ढगांमध्ये असलेल्या पाण्याचे थेंब ओळखतो. त्यामुळे पाऊस कुठे पडत आहे, किती तीव्र आहे आणि कोणत्या दिशेने सरकत आहे, याचा अंदाज मिळतो.

Picture Credit:  pinterest

Satellite ची महत्त्वाची भूमिका

हवामान उपग्रह पृथ्वीवरील ढगांची सतत छायाचित्रं घेतात. या माहितीच्या आधारे मोठ्या भागातील पावसाची शक्यता ओळखता येते.

Picture Credit:  pinterest

AI आणि Supercomputers ची मदत

आज लाखो हवामानविषयक माहितीचं विश्लेषण AI आणि Supercomputers करतात. त्यामुळे पावसाचा अंदाज पूर्वीपेक्षा अधिक अचूक मिळतो.

Picture Credit:  pinterest

Doppler Radar काय सांगतो?

Doppler Radar केवळ पाऊसच नाही तर वादळ, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग यांचाही अभ्यास करतो. त्यामुळे वेळेवर इशारे देणं शक्य होतं.

Picture Credit:  pinterest

म्हणूनच हवामानाचा अंदाज अधिक अचूक

Rain Gauge, Weather Radar, Satellite, Doppler Radar आणि AI या तंत्रज्ञानामुळे आज पावसाचं मोजमाप आणि हवामानाचा अंदाज अधिक विश्वासार्ह झाला आहे.

Picture Credit:  pinterest