Published Dec 19, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आपण लहानपणापासून ऐकलं आहे की, बैलाला लाल रंग पाहून राग येतो.
पण बैलाला खरच लाल रंग पाहून राग येतो का?
खरं तर या अफवा आहेत की बैलाला लाल रंग पाहून राग येतो.
बैल इतर प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणे कलर ब्लाईंड असतो.
इतर प्राणी आणि पक्ष्यांप्रमाणे बैल देखील लाल आणि हिरवा रंग पाहू शकत नाही.
खरं तर बैलाला लाल रंगाच्या कपड्याचा नाही तर तो हलवण्याच्या पद्धतीचा राग येतो.
कपडा कोणत्या रंगाचा आहे, यामुळे बैलाला काहीही फरक पडत नाही.
बैलासमोर जेव्हा कोणताही कपडा हलवला जातो तेव्हा त्याला राग येतो.
बैलाला लाल रंगासोबत जोडण्याच्या कथा स्पेनमधून सुरु झाल्या आहेत.