हिवाळ्यात पुरुषांनीही त्वचेची काळजी घ्यायला हवी

Life style

15 November, 2025

Author:  नुपूर भगत

थंडीत हार्श फेसवॉश टाळा. सौम्य, सल्फेट-फ्री क्लिन्झर वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

 सौम्य क्लिन्झरचा वापर

Picture Credit: Pinterest

जास्त गरम पाणी त्वचेतील तेलं काढून टाकते. त्यामुळे कोमट पाण्यानेच अंघोळ करा आणि लांब वेळ आंघोळ टाळा.

अंघोळीसाठी कोमट पाणी

Picture Credit: Pinterest

 दररोज चेहरा धुतल्यावर आणि रात्री झोपण्याआधी मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ राहते.

 मॉइश्चरायझर लावा

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात ओठ आणि हात आधी सुकायला लागतात. त्यामुळे कोको बटर/शेया बटर असलेला लिप बाम आणि हँड क्रीम वापरा.

लिप बाम-हँड क्रीम

Picture Credit: Pinterest

स्किनवरील मृत पेशी काढण्यासाठी सौम्य स्क्रब वापरा. मात्र आठवड्यातून एकदाच करा; जास्त स्क्रबिंगने त्वचा कोरडी होते.

  एक्सफोलिएशन करा

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी UV किरणांचा त्वचेवर परिणाम होतो. कमीत कमी SPF 30 असलेला सनस्क्रीन वापरा.

  सनस्क्रीन लावा

Picture Credit: Pinterest

थंडीत तहान कमी लागते, पण शरीराला हायड्रेशन आवश्यक असते. पुरेसे पाणी, फळे, हिरव्या भाज्या खाल्ल्याने त्वचा आतून पोषित होते.

पुरेसे पाणी

Picture Credit: Pinterest