डिहायड्रेशन दूर करण्यासाठी पाण्यात या गोष्टी मिसळा 

Lifestyle

18  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उन्हाळा

उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि यावेळी डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे पाण्यात अशा काही गोष्टी मिसळून प्यायल्यास डिहायड्रेशन दूर होण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात डिहायड्रेशन दूर करण्यासाठी लिंबू, जिरे, धणे, तुळशीची पाने इत्यादी पाण्यात मिक्स करून पॅल्यास फायदा होऊ शकतो.

डिहायड्रेशन दूर करणे

Picture Credit: Pinterest

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते. जे शरीराला ताजेतवाने ठेवते. यामुळे उन्हाळ्यामध्ये थकवा कमी होतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 

लिंबू

Picture Credit: Pinterest

पुदिना शरीरातील अंतर्गत उष्णता आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. याचा सुगंध पाण्याला चवदार बनवतो आणि पचनाच्या तक्रारीसाठी गुणकारी ठरते. 

पुदिना

Picture Credit: Pinterest

जिरे

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोट फुगणे, अपचन किंवा शरीरातील जडपणा कमी करतो. उष्णतेमुळे पोटाला होणारा त्रास कमी होतो.

Picture Credit: Pinterest

धणे शरीरातील वाढलेली उष्णता शोषून घेते आणि शरीर शांत ठेवण्यास मदत करते. पचन नीट होण्यासाठी धण्याचे पाणी फायदेशीर आहे.

धणे

Picture Credit: Pinterest

तुळशीच्या पानांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. उष्णतेमुळे येणारा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त आहेत.

तुळशीची पाने

Picture Credit: Pinterest