Published Nov 6, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
आवळ्याचा रस पिण्याने होतात 'हे' कमालीचे फायदे
आवळ्यात व्हिटॅमिन C भरपूर असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक आजारांपासून संरक्षण देते.
आवळ्यात मेटाबॉलिजम वाढवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
आवळ्याचा रस कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
.
आवळ्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतो, त्यामुळे मधुमेहासाठी हा रस फायदेशीर ठरतो.
.
आवळ्यात फायबर असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते व गॅस, अपचन, आणि बद्धकोष्ठतेसारखे त्रास कमी होतात.
आवळ्याच्या रसात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा पोत सुधारतात, त्वचा चमकदार आणि टवटवीत ठेवतात.
आवळा केसांच्या मुळांना बळकट करतो, केस गळणे कमी करतो आणि केसांना नैसर्गिक चमक देतो.
हा रस योग्य प्रमाणात आणि वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा आम्ही कोणताही दावा करत नाही