Published Oct 07, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
जास्त कोल्ड ड्रिंक पिण्याचे होतात 'हे' गंभीर परिणाम
ऑक्टोबर हिट सुरु झाली आहे त्यामुळे बहुतांश लोक मोठ्या प्रमाणात कोल्ड ड्रिंक पीतात.
आजकाल खाद्यपदार्थाबरोबरही ( Snacks) कोल्ड ड्रींक्स पिण्याची सवय आहे.
हे कोल्ड ड्रिंक पिणे अथवा त्याची सवय शरीरासाठी नुकसान देणारी ठरु शकते. जाणून घ्या त्याबद्दल
कोल्ड ड्रिंक मध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे शुगर वाढते आणि मधुमेहाचा धोका ही संभवतो.
.
कोल्ड ड्रिंक्स दातांसाठी नुकसान करु शकते . कोल्ड ड्रिंक हे दातामधील कॅविटी बनण्याचे कारण असू शकते.
जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक पिण्याने तुमच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
कोल्ड ड्रिंकमध्ये शुगर जास्त प्रमाणात असल्याने वजन वाढ होऊ शकते.
कोल्ड ड्रिंकमध्ये कोणतेही पोषक तत्वे नसतात. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांच्याबाबतीत फायदाही होत नाही.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्यावे, आम्ही कोणताही दावा करत नाही