www.navarashtra.com

Published  Oct 05, 2024

By  Narayan Parab

Pic Credit - Social Media

जास्त पाव खाण्याचे दुष्परिणाम 

जगभरामध्ये पाव  हा मोठ्या प्रमाणात खाण्यात येतो. अगदी भारतामध्येही अनेक खाद्यपदार्थांमध्ये पावाचा समावेश होतो. 

पाव 

वडापाव, पावभाजी, मिसळपाव असे पाव असणारे पदार्थ लोकांच्या आवडीचे आहेत.

पाव आणि खाद्यपदार्थ

जास्त पाव खाणे हे शरीराला नुकसान देणारे असते. ज्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागते

जास्त पाव खाणे

.

पावामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. 

शुगर वाढते

.

पावाच्या अतिखाण्याने गॅसची समस्या होण्याचा धोका असतो. पावात ग्ल्युटेन असल्याने पचण्यासही जड असतो.

गॅसची समस्या

पावात मैदा असतो. या मैद्याने शरीरातील कॅलरीज वाढतात त्याचा परिणाम वजन वाढते .

वजन वाढते

उच्च रक्त दाबाची समस्या असणाऱ्यांसाठीही पाव जास्त खाणे हानिकारक आहे. 

उच्च रक्त दाब 

पावामध्ये पोषणद्रव्य अतिशय कमी असतात. त्यातून फायबर व्हिटॅमिन मिळत नाही.

पोषक घटकांचा अभाव

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

उपाशीपोटी दूध-केळं खाल्ल्याने काय होते?