दसऱ्याच्या ताटात कोणते पदार्थ असतात खास?

Lifestyle

19 October 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दसऱ्याचा सण म्हटलं की घरात बनणाऱ्या गोडाधोडाच्या पदार्थांची खास मेजवानी असते. या दिवशी कोणते पदार्थ बनवले जातात. जाणून घ्या

दसऱ्याचा पारंपरिक मेन्यू

Picture Credit: Pinterest

दसऱ्याच्या जेवणातील लोकप्रिय बेत म्हणजे श्रीखंड-पुरी. गार श्रीखंड, गरमागरम पुरी आणि बटाट्याची भाजी यांची रंगतच वेगळी!

श्रीखंड-पुरी

Picture Credit: Pinterest

पुरणपोळी

चणाडाळ आणि गुळापासून बनवलेली पुरणपोळी हा सणासुदीचा आवडता गोड पदार्थ आहे. तुपासोबत तिची चव आणखी खुलते.

Picture Credit: Pinterest

बटाट्याची भाजी

Picture Credit: Pinterest

पिवळसर बटाट्याची भाजी पुरीसोबत छान लागते. कमी साहित्यांत तयार होणारा हा पदार्थ सणाच्या ताटाची रंगत वाढवतो

वरण-भात

Picture Credit: Pinterest

साधं वरण, गरम भात आणि वरून साजूक तूप! सणाच्या जेवणात या साध्या पण आवडत्या पदार्थालाही महत्त्व असतं.

बासुंदी

Picture Credit: Pinterest

दूध आटवून तयार केलेली घट्ट, गोड बासुंदी हा सणासुदीच्या जेवणासाठी आणखी एक छान पर्याय आहे.

सणाचं ताट सजवा!

Picture Credit: Pinterest

श्रीखंड-पुरी, भाजी, वरण-भात, कोशिंबीर, पापड आणि लोणचं असा बेत करून दसऱ्याचं जेवण खास बनवा.