सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची साल काढा.
Picture Credit: Pinterest
उकडलेली केळी आणि बटाटे एका भांड्यात घेऊन चांगले मॅश करून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला.
Picture Credit: Pinterest
आता मिश्रणात तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य एकत्र मळून घ्या. यामुळे टिक्कीला छान आकार देता येईल.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने गोल, चपट्या टिक्क्या बनवा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर थोडे तेल गरम करून टिक्क्या मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम कच्च्या केळ्याची टिक्की प्लेटमध्ये काढा आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest