पिझ्झा सँडविच हा एक चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे
Picture Credit: iStock
४ ब्रेड स्लाइस, १/२ कप उकडलेली व चिरलेली शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, चीज, २ चमचे पिझ्झा सॉस, थोडा ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स
प्रत्येक ब्रेड स्लाइसवर पिझ्झा सॉस पसरवा.
पिझ्झा सॉसवर चिरलेली भाजी टाका. हवे असल्यास स्वीट कॉर्न किंवा ऑलिव्ह्स वापरू शकता.
वरून किसलेले चीज टाका. आवडीनुसार मोझरेला चीज वापरू शकता.
थोडेसे ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स शिंपडा.
दुसरी ब्रेड स्लाइस वर ठेवून सॅंडविच करा. तवा गरम करून थोडं लोणी लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
गरम गरम पिझ्झा सॅंडविच तुकडे करून सॉस किंवा केचपसोबत सर्व्ह करा.