व्हिटॅमिन ई साठी खा हे पदार्थ

Written By: Prajakta Pradhan 

Source: Pinterest

शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन ई हे त्यापैकी एक आहे. 

व्हिटॅमिन ई चे कार्य 

शरीरात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे हात आणि पाय सुन्न होणे, आळस येणे, थकवा येणे, स्नायू कमकुवत होणे आणि डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन ईची कमतरता

असे काही पदार्थ आहेत ज्यांने व्हिटॅमिन ई पुरेपुर प्रमाणात तुम्हाला मिळेल. कोणत्या पदार्थाचे सेवन करावे ते जाणून घ्या

व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ

बदाम तुमची स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता देखील पूर्ण करते.

बदाम

ब्रोकोली हे पोषक तत्वांचे एक शक्तिशाली साधन मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी,  व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम इत्यादी घटक असतात.

ब्रोकोली

व्हिटॅमिन ई साठी तुम्ही पालक खावे. हे हाडे देखील मजबूत ठेवते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण असते

पालक

व्हिटॅमिन ई साठी तुम्ही अंड्यांचे सेवन देखील करु शकता. मात्र, उन्हाळ्यात एक किंवा दोन अंडी खावी. अंड्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन डी देखील भरपूर असते.

अंड

जे लोग रोज सकाळी नाश्त्याला एवोकॅडोचे सेवन करतात अशा लोकांच्या शरीरात कधीही व्हिटॅमिन ईची कमतरता नसते.

एवोकॅडो