हिवाळा सुरु झाला आहे. यामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. लोक त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करत आहेत.
हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये या भाज्यांचा समावेश करा त्यामुळे तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहील. कोणत्या आहेत त्या भाज्या जाणून घ्या
जे लोक रोज गाजर खातात त्यांचे डोळे नेहमी चांगले राहतात. कारण त्यामध्ये व्हिटॅमीन ए असते आणि ते डोळ्यांसाठी फायदेशीर असते
हिवाळ्यात पालक खावा. त्यामध्ये आयरन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के इत्यादी प्रथिने असतात
जे लोक हिवाळ्यात बीट खातात त्या लोकांची रक्ताची कमतरता दूर होते. त्यामध्ये पोटॅशिअम, आयरन यांसारखे गुणधर्म असतात.
मेथी खाण्यास थोडी कडू पण प्रथिनेयुक्त असते. यामध्ये फायबर, आयरन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 यांसारखे गुणधर्म असतात.
सलगममध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांसारखे गुणधर्म असतात.
भाज्या खाताना त्या मर्यादित प्रमाणात खाव्यात नाहीतर तुमचे आरोग्य बिघडू शकते