ज्यावेळी आपण जेवण बनवतो त्यावेळी सालं काढून टाकतो. कारण घाणेरडे बॅक्टेरिया आपल्या पोटात जाऊ नये. त्यातील काही भाज्या अशा असतात त्यांची साल खाणे फायदेशीर असतात
अशा काही भाज्या आहेत त्या सालांसोबत खाल्ल्याने तुम्ही कायम निरोगी राहू शकतात. कोणत्या आहेत त्या जाणून घ्या
बटाटे सोलल्याशिवाय खावेत. त्यामध्ये फायबर, आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमीन सी इत्यादी घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
जे लोक काकडी सोलल्याशिवाय खातात त्यांची त्वचा आणि हाडे लोहासारखी मजबूत राहतात. कारण यामध्ये व्हिटॅमीन के, पोटॅशियम असते
गाजर सहसा सोलल्याशिवाय खाल्ले जातात. गाजर सोलल्याशिवाय खाल्ल्याने डोळे चांगले राहतात.
सोललेली वांगी खाल्ल्याने अल्झायमरचा धोका कमी होतो आणि स्मरणशक्ती मजबूत होते. वांगी हे पोषक तत्वांचे भांडार आहे.
ज्यावेळी तुम्ही भाज्या सोलल्याशिवाय खात आहात त्यावेळी त्या चांगल्या पाण्याने धुवून घ्या.
भाज्या खाताना आपण मर्यादेकडे लक्ष द्यावे. जास्त खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.