EVची पूर्ण रक्कम घेऊनही अनेक महिने वाहनाची डिलिव्हरी न केल्याप्रकरणी Ola Electricला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे.
Picture Credit : Pinterest
ग्राहकाने Ola Roadster X Plus बुक केली होती. 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्याने वाहनाची पूर्ण किंमत 1,34,161 भरली.
Picture Credit : Pinterest
वाहनाची डिलिव्हरी 23 ऑक्टोबर 2025 रोजी होणे अपेक्षित होते. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही ग्राहकाला बाइक मिळाली नाही.
Picture Credit : Pinterest
ग्राहकाने ई-मेल, कस्टमर सपोर्ट आणि कंपनीच्या grievance mechanismद्वारे वारंवार संपर्क केला. तरीही वाहनाची डिलिव्हरी झाली नाही.
Picture Credit : Pinterest
आयोगाने स्पष्ट केले की अंदाजे डिलिव्हरी तारीख असल्याने कंपनीला काही operational flexibility मिळू शकते. पण ग्राहकाचे पूर्ण पैसे घेऊन अनिश्चित काळापर्यंत डिलिव्हरी लांबवता येणार नाही.
Ola Electricला ग्राहकाची 1,34,161 ही पूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर 2 ऑक्टोबर 2025 पासून वार्षिक 12% व्याज देखील द्यावे लागणार आहे.
Picture Credit : Pinterest
ग्राहकाला झालेला आजीविकेचा नुकसान, मानसिक त्रास आणि गैरसोय लक्षात घेऊन आयोगाने आणखी 90,000 भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
Picture Credit : Pinterest
याशिवाय Ola Electricला ग्राहकाच्या कायदेशीर खर्चासाठी 10,000 अतिरिक्त देण्याचे आदेश आहेत. म्हणजे व्याज वगळता परतावा आणि भरपाईची रक्कम मिळून 2,34,161 होते.
Picture Credit : Pinterest
आयोगाच्या आदेशानुसार कंपनीला आदेश मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत संबंधित रक्कम देणे अपेक्षित आहे. या प्रकरणामुळे EV खरेदी करताना promised delivery आणि payment records जपून ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित होते.