Published Dev 21, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आजकाल डायबिटीस हा आजार तरूणांमध्येही होताना दिसून येत आहे. साखरेची पातळी जास्त असेल तर काय खावे
कामिनेनी रूग्णालय, हैदराबाद येथील वरीष्ठ आहार विशेषज्ज्ञ डॉ. लक्ष्मीनुसार, ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी बडिशेप खावी
बडिशेपेत खूप पोषक तत्व असून ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी याचा फायदा होतो
बडिशेपमध्ये फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून याचे सेवन केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो
बडिशेपमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असून सेवन केल्याने टाईप - 2 डायबिटीसचा धोका कमी होण्यास मदत मिळते
बडिशेपच्या सेवनाने पचनाच्या समस्याही दूर होतात आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता
.
याशिवाय बडिशेपेतील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते
.
ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी रात्री जेवणानंतर बडिशेप खावी. तसंच सकाळी उपाशीपोटी बडिशेपचा चहा वा पाणी प्यावे
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.