Published Dev 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हिवाळ्यात सूप हे केवळ तुम्हाला उर्जा मिळवून देत नाही तर काही समस्यांवर उत्तम उपायदेखील ठरते
डाएटिशियन मनप्रीत कारलानुसार, शरीरातील वात दोषामुळे सांधेदुखी होते. वातदोष संतुलित करण्यासाठी सूप प्यावे
एका कुकरमध्ये 70-70 ग्रॅम दुधी-गाजर उकडवा. दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा तूप, हळद, आलं मिक्स करून भाजा, त्यात उकडलेले पदार्थ मिक्स करा
यानंतर वरून तुम्ही काळे मीठ, जायफळ पावडर आणि काळी मिरी पावडर मिक्स करून सूप उकळवा आणि मग प्या
दुधीमध्ये बीटा कॅरेटीन असून सांधेदुखी आणि सूज कमी होते. याशिवाय गाजरात अँटीऑक्सिडंट्स असून फायदा होतो
तुपात कंजुगेटेड लिनोलिक अॅसिड आढळते जे सांधे मजबूत ठेवण्यास मदत करते
.
हळदीतील करक्युमिन सूज कमी करून आल्यातील जिंजेरॉल सांधे मजबूत करण्यास मदत करतात
.
काळ्या मिरीतील पिपेरीन हाडांना मजबूत करते, तर जायफळमधील पोषक तत्व सांधेदुखी कमी करते
.
दुधी गाजराच्या या सुपात अनेक पोषक तत्व असून सांध्यांना हेल्दी राखण्यास फायदा होतो आणि सूजही येत नाही
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.