इंजिन कसे काम करते? वाचून आश्चर्य वाटेल

Automobile

14 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

तुम्ही कधी विचार केला का?

तुम्ही दररोज चालवत असलेल्या गाड्या आणि बाईक याच्या आत नेमके काय होते? माहिती आहे?

Picture Credit : Pinterest

ऊर्जा कशी निर्माण होते?

तुम्ही गाडी चालवता त्यावेळी वाहनाच्या इंजिनमध्ये अशी कोणती प्रक्रिया घडते, ज्यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि वाहन पुढे जाते?

Picture Credit : Pinterest

कठीण प्रक्रिया

इंजिन सिलेंडरमध्ये एक अतिशय वेगवान आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सुरु होते. जी संपूर्ण चेंबरला भट्टीत रुपांतरित करते.

Picture Credit : Pinterest

आणि गाडी पुढे जाते

ही प्रक्रिया गाडीला पुढे जाण्यासाठी मदत करते. बहुतेक पेट्रोल कार आणि बाईक्समध्ये ४-स्ट्रोक इंजिन वापरले जातात.

Picture Credit : Pinterest

जाणून घ्या प्रक्रिया

हे इंजिन चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम करते. ३ डी ऍनिमेशनच्या माध्यमातून पाहिल्यास, संपूर्ण प्रक्रिया सहजपणे समजू शकते.

Picture Credit : Pinterest

स्टेप १

सर्वप्रथम, पिस्टन खाली सरकतो, ज्यामुळे सिलेंडरच्या आत इंधन आणि हवेसाठी जागा निर्माण होते आणि हवा इंधन मिश्रण तयार होते.

Picture Credit : Pinterest

स्टेप २

यामुळे पिस्टन वरच्या दिशेने सरकतो ज्यामुळे सिलेंडरमधील हवा-इंधन मिश्रणावर दाब येतो. हे मिश्रण जितके जास्त संकुचित होते. तितका स्फोट अधिक प्रभावी होतो.

Picture Credit : Pinterest

स्टेप ३

गाडी सुरु झाल्यावर मग ती सेल्ट-स्टार्टिंग असो किंवा किक स्टार्टिंग, स्पार्क प्लगमधून एक ठिणगी बाहेर पडते. ज्यामुळे मिश्रण पेट घेते आणि एक मोठा स्फोट होतो.

Picture Credit : Pinterest

वीज निर्मिती

या स्फोटामुळे निर्माण झालेला दाब पिस्टनला वेगाने खाली ढकलतो. हाच तो टप्पा आहे जिथे इंजिन खरी शक्ती निर्माण करते आणि ऊर्जा वाहनाच्या चाकांपर्यंत पोहोचवली जाते.

Picture Credit : Pinterest

स्टेप ४

शेवटी, पिस्टन पुन्हा वर सरकतो आणि ज्वलनानंतर उरलेला वायू सिलेंडरमधून बाहेर पडतो, ज्याला एक्झॉस्ट स्मोक म्हणतात.

Picture Credit : Pinterest

सतत प्रक्रिया

ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक सेकंदाला सुरु राहते. ज्यामुळे वाहनाचे इंजिन पेटते, ऊर्जा निर्माण होते आणि नंतर एक्झॉस्टमधून धूर बाहेर टाकला जातो. 

Picture Credit : Pinterest