महाभयंकर! फोन गरम होतो आणि मग बँक खाते होते रिकामे

Science Technology

20 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सायबर फसवणूक

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. ते हुशारीने मेसेज करतात आणि नंतर बँक खाते रिकामे होते.

Picture Credit: Pinterest

मुंबईतील प्रकरण

मुंबईत नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीचा स्मार्टफोन अचानक गरम झाला आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेण्यात आले.

Picture Credit: Pinterest

बँक खाते झाले रिकामे

सायबर फसवणुकीच्या या प्रकरणात पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून ७० हजार रुपये चोरले गेले. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Picture Credit: Pinterest

अनोळखी नंबरला रिप्लाय देऊ नका. किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. 

मेसेजला रिप्लाय

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन हॅकिंग ओळखणे खूप सोपे आहे. यासाठी फक्त मोबाईल हॅकिंग दरम्यान दिसणाऱ्या काही सामान्य लक्षणांची जाणीव असणे आवश्यक आहे.

हॅकिंग ओळखणे सोपे

Picture Credit: Pinterest

हॅकिंग दरम्यान मोबाईल रिमोटने ऍक्सेस केला जातो, ज्यामुळे तो जास्त गरम होतो. 

अतिउष्णता देखील एक लक्षण

\Picture Credit: Pinterest

हॅकिंगच्या वेळी स्मार्टफोन रिमोट ऍक्सेसच्या अधीन असतात. ज्यामुळे डेटाचा वापर वाढतो. जर तुमचा फोन गरजेपेक्षा जास्त डेटा वापरत असेल, तर ते सायबर हॅकिंगचे लक्षण असू शकते.

डेटाचा अधिक वापर

Picture Credit: Pinterest

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी अचानक वेगाने संपू लागली, तर ते सायबर हॅकिंगचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत फोनचे वाय-फाय आणि इंटरनेट डेटा बंद करा.

बॅटरी लवकर संपते

Picture Credit: Pinterest

तुमच्या मोबाईलमध्ये अचानक विचित्र पॉप-अप दिसू लागला, तर त्या पॉप-ऍपचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचा स्मार्टफोन रीसेट करा.

पॉपअप दिसला

Picture Credit: Pinterest