घरात नेहमी आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा असावी असे प्रत्येकाला वाटते. पण कधीकधी घरमध्ये वाईट शक्तींनी प्रवेश केलेला असतो.
घरात आनंद टिकवून ठेवण्यासाठी वास्तुचे काही सोपे उपाय केल्यास घरातील वाईट नजरेपासून आणि नकारात्मक उर्जेपासून दूर होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वार हा एक महत्त्वाचा भाग असतो. यावेळी स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह लावू शकता.
याशिवाय मुख्यद्वाराजवळ एका भांड्यात तुरटी ठेवू शकता. ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असल्याने ते दर आठवड्याला बदलणे महत्त्वाचे आहे.
वास्तुसास्त्रानुसार, आग्नेय दिशा ही दुर्गा देवीची दिशा मानली जाते. या ठिकाणी पितळेचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
आग्नेय दिशेला पांढरे चंदन, कापूर जाळल्याने घराची ऊर्जा शुद्ध होते.
हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. घराच्या ईशान्य दिशेला खिडकी किंवा दरवाज्याजवळ ठेवा.
याशिवाय घराच्या उत्तर पूर्व दिशेला मोराचे पेंटीग लावल्याने वाईट नजरेपासून रक्षण होते.
नैऋत्य दिशेला देवदार किंवा लोबानचा सुगंध पसरवल्याने स्थिरता आणि सुरक्षितता येते. तसेच वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखले जाते.