Published August 09, 2024
By Divesh Chavan
नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवा. पाणी किंवा इतर पोषकतत्व असणारे पेय नियमित स्वरूपात पीत चला.
स्वतःला अशक्तपणापासून दूर ठेवण्यासाठी फळे खा. खासकरून उपवासात केळी खाणे जास्त फायद्याचे ठरेल.
.
उपवासादरम्यान ड्राय फ्रुट्सचे सेवन एनर्जी बूस्टर म्हणून कार्य करेल. रिकाम्या पोटीही व्यक्तीला शरीरात ऊर्जा जाणवेल.
वाटीभर फळांमध्ये दही मिक्स करा. हे मिश्रण खाल्याने शरीर ताजे राहीलच तर शरीराला थंडावाही मिळेल.
विशेष म्हणजे पचण्यास जड असलेले पदार्थवर उपवास सोडू नये. अपचन होऊन शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
उपवासादरम्यान तिखट गोष्टींचे सेवन करणे टाळा. मुख्यतः सौम्य खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्या.
तणाव मानसिक थकव्यास कारणीभूत ठरतो. उपवासादरम्यान तणावापासून दूर राहून प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा.
स्वतःला शक्य तितके आराम द्या. जास्त हालचाल केल्याने भूक लागण्याची शक्यता वाढते.