हिवाळ्यात थंड हवा नसांना दाबते. ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय खावे जाणून घ्या
लसूण रक्तदाब चांगले ठेवतो आणि नसांना आराम देतो. रोज कच्चा किंवा शिजवलेला लसूण खाल्ल्याने हिवाळ्यात उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो.
पालक, मेथी आणि मोहरी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये पोटॅशियम असते. जे रक्तदाब संतुलित ठेवते. हिवाळ्यात याचे नियमित सेवन केल्याने शरीर आतून चांगले राहते.
अक्रोड आणि बदामधील फॅट आरोग्यासाठी फायदेशीर असते. मर्यादित प्रमाणात अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने थंडीत वाढणारे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहते.
भाज्या आणि डाळींपासून बनवलेले गरम सूप शरीराला उबदार ठेवते. हे रक्तवाहिन्यांमधील रक्तसंचय कमी करते आणि संतुलित रक्तदाब राखण्यास मदत करते.
सफरचंद, संत्र आणि डाळिंब यांसारख्या फळांमध्ये अॅण्टीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म असतात. हे हृद्य चांगले ठेवते आणि हिवाळ्यात रक्तदाबाच्या संबंधित समस्या कमी करते.
जवस आणि माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. हे जळजळ कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.