Published March 12, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
कोकणात एक दिवस नाही तर स्थानिक परंपरेनुसार ८ ते १५ दिवसांसाठी होळी उत्सव असतो.
कोकणात होळी या सणाला शिमगा असे म्हंटले जाते.
१५ दिवसांसाठी गावची मंडळी सोंग घेऊन गावागावात फिरत असतात.
संकासूरही हातामध्ये चाबूक घेऊन गावभर आशीर्वाद देत फिरत असतो.
पालखीला शरण लागते म्हणजे पालखी स्वतःहून लपवलेले श्रीफळ शोधते.
मुंबई पुण्याहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात हजेरी लावतात.
या दिवशी राज्यभारत घरोघरी पुरणपोळीचा बेत केला जातो.