www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Divesh Chavan

मराठ्यांचा गौरवशाली पराक्रमाची जाणीव करून देणारे गडकिल्ले

Pic Credit -  Social Media

सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये सातारच्या मातीत रुबाबात उभा असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझल खानाचा वध केला होता.

प्रतापगड

लोणावळ्याच्या नजीकच असलेला लोहगड आपल्या गौरवशाली इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

लोहगड

किल्ले तोरणा पुण्यात स्थित असून किल्ल्याला 'प्रचंडगड' या नावानेदेखील ओळखले जाते. 

किल्ले तोरणा

प्रत्येक मराठी माणसासाठी धरतीवरचा स्वर्ग जो काही असेल तो म्हणजे 'श्री दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड'. 

किल्ले रायगड

मराठा आरमारातील प्रमुख असा सागरी किल्ला म्हणून 'किल्ले सिंधुदुर्ग' प्रसिद्ध आहे. 

किल्ले सिंधुदुर्ग

छत्रपती शिवजी महाराजांचे जन्मस्थळ 'किल्ले शिवनेरी' पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे. 

किल्ले शिवनेरी

नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने मराठ्यांच्या तावडीत आणलेला किल्ला म्हणजे 'कोंढाणा'. या किल्ल्याचे नाव नरवीरांना आदरांजली म्हणून सिंहगड ठेवण्यात आले. 

किल्ले सिंहगड